श्रीरामपूर : चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर येथे भारतीय संविधान उद्देशिका वाचन व वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एकत्रितपणे संविधानातील मूल्ये अंगीकारण्याची, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि न्याय या मूल्यांना अभिवादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कांबळे हे होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी मा. प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी आपल्या मनोगतात संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आचरणात आणावीत, असे आवाहन केले. तसेच लोकशाहीची जपणूक करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांनी वैयक्तिक पातळीवर आपल्या गावामध्ये सुद्धा संविधान उद्देशिकेचे वितरण करून जनजागृती केली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शारीरिक शिक्षण संचालक मा. सुभाष देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कैलास दातीर, ए. एन. ओ. प्रा.विजय नागपुरे, प्रा. सारिका पेरणे, उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापकांनी एकत्रितपणे प्रस्तावनेचे वाचन करून संविधानाबद्दल आदर व्यक्त केला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, जबाबदारी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करणारा ठरला.
डाकले महाविद्यालयात संविधान उद्देशिका वितरण व शपथ ग्रहण उपक्रम संपन्न







