शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार माजी खा. सुजय विखे पा. यांना जाहीर

---Advertisement---


श्रीरामपूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार” यंदा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिली आहे.
. या कार्यक्रमात सुजय दादा विखे पाटील यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी गुरुवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर “भिमसूर्य क्रांती” या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजात करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, भाजपाचे दीपक पटारे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, नेते राजाभाऊ कापसे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी, पक्ष प्रतोद वैशालीताई चव्हाण, नगरसेवक आशिष धनवटे, भाजपाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक दीपक चव्हाण, नगरसेवक मनोज लबडे, नगरसेविका आशाताई रासकर, नगरसेवक संजय गांगड, आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भीमराव बागुल, सचिन ब्राह्मणे, विशाल सुरडकर प्रकाश ढोकणे, चरण त्रिभुवन, संजय रूपटक्के, रॉकी लोंढे, संतोष मोकळ, रमादेवी धीवर, संजय बोरगे किशोर ठोकळ, अमोल काळे, दादासाहेब बनकर, अर्जुन शेजवळ आदींनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment