शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मराठी बाणा जपूनच प्रगती साधा- सौ. सुवर्णाताई विखे पाटील यांचे आवाहन

---Advertisement---

लोणी: आजच्या आधुनिक युगात प्रगती करताना आपला मराठी कणा मोडू न देणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. आपली भाषा, सण आणि छत्रपती शिवरायांचे विचार जपणे, हाच आपल्या मातीचा खरा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील यांनी केले.लोणी येथील ग्रामीण दंत महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. शुभांगी म्हस्के, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. उमेश पालेकर, प्राचार्य डॉ. राजू अनर्थे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला प्राचार्य डॉ. राजू अनर्थे यांनी प्रास्ताविक व वार्षिक अहवाल वाचन केले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल किरण पठारे, वेदा खाडीलकर, साई शेट्टी व निकीता गुप्ता या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी मराठी बाणा या संकल्पनेवर आधारित सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम होते. महाराष्ट्राची लोककला, गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरज मोहाता, हार्दीकी येवतेकर, मेघा आसनानी, साक्षी सोंबरे, सुजाता चौधरी, वैष्णवी देशमुख, तन्मयी झूंजारराव व चंदा निकम यांनी अतिशय उत्साही वातावरणात केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment