श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेच्या साठवण तलावाच्या उत्खननातून निघालेल्या मुरुमाची मोजणी करून विक्री करावी या नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या लढ्याला यश आले आहे. आतापर्यंत मोजलेल्या मुरुमाच्या विक्रीतून शासनाला तब्बल १ कोटी रुपयांचा नफा झाल्याचेही समोर आले आहे. नगरपरिषदेच्या साठवण तलावाच्या रुंदीकरण व खोलीकरण कामातील मुरूम संगमनेर रस्त्यावरील नगरपरिषदेच्या प्लॉटवर साठवण्यात आला होता. या मुरूमापैकी फक्त दोन ते अडीच हजार ब्रश मुरूम विक्री परवानगी देण्याचा प्रयत्न प्रशासन व ठेकेदार अशा अभद्र युतीकडून सुरू होता. याची माहिती मिळताच मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे व नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली. ना.विखे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण मुरुमाची मोजणी करण्याची सुरवात श्रीरामपूर तहसील कार्यालयाने केली.आतापर्यंत ३१ हजार ६१६ ब्रास मुरुमाची मोजणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १५ हजार ब्रास मुरूम खरेदीपोटी भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने तब्बल १ कोटी ३ लाख ४१ हजार ८२० रुपयांची रॉयल्टी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांचेकडे भरल्याचे समोर आले आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या हजारो ब्रास मुरुमामुळे शासनाला अंदाजे ५ ते ६ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. शासनाचे नुकसान होऊ नये म्हणून कठोर भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जिल्हाधिकारी पंकज आशिया, श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, भूमीअभिलेखचे उपअधीक्षक रविंद्र खरोटे यांचे केतन खोरे यांनी आभार मानले. तसेच उर्वरीत मुरुमाची मोजणी करूनच विक्री करण्याची मागणी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.
नगरपालिका मुरुमाच्या लढ्यात खोरेंना यशशासनाच्या तिजोरीत कोट्यवधीने वाढ







