लोणी : लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलने गणित,विज्ञान व कॉम्प्युटर सायन्स ओलम्पियाड २८२५-२६ या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सायन्स ओलम्पियाड फाउंडेशनच्या माध्यमातून विज्ञान, गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान व इंटरनॅशनल कॉम्प्युटर सायन्स अशा विविध विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या सुमारे सहाशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यातील सुमारे १०५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके मिळावली. तसेच शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी शिंदे सिद्धेश चांगदेव यास एस ओ एफ डिफेन्स सर्विसेस अकॅडमिक एक्सलन्स स्कॉलरशीप प्राप्त झाली. त्यास विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल एस ओ एफ कडून सुवर्णपदक, प्रमाणपत्र व रुपये पाच हजार चा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच विविध स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करून घेतली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी विविध सेवा सुविधा तसेच तज्ञांचे मार्गदर्शन दिल्याने प्रवरेचा विद्यार्थी हा अव्वल स्थानावर आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम. एस. जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी, परीक्षा समन्वयक सौ शबनम सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत पाटील घोगरे, अतांत्रिक संचालक डाॅ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे यांनी विशेष अभिनंदन केले.
प्रवरा पब्लिक स्कूलचे ओलंपियाड परीक्षेत घवघवीत यश







