परीक्षार्थी उमेदवारांनी मानले प्रशासनाचे मनापासून आभार.
पुणे – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची महापारेषण ही एक अग्रगण्य शाखा समजली जाते.
महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी ही प्रामुख्याने उच्च दाबाने विदयुत पुरवठा दुरपर्यत वहन करण्याचे महत्वाचे काम करते. संपूर्ण महाराष्ट्रात या विद्युत पारेषण कंपनीचे जाळे पसरले असून भारतात नेटवर्किंगच्या बाबतीत महापारेषणचा पहिला क्रमांक लागतो. या मुळे प्रत्येक आय. टी. आय. पदवीधारकाचे या कंपनीत नोकरीची संधी मिळावी हे एक स्वप्न असते.
अशा आय. टी. आय. पदवी धारकांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी महापारेषण च्या प्रशासनाने पूर्ण प्रयत्न करून मध्यंतरी वेळोवेळी लागलेल्या निवडणुक आचारसंहितेच्या नियमांचे पालन करीत विद्युत सहायक यांची एकूण 277 पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केली.
तसेच त्यासोबत वरिष्ठ तंत्रज्ञ याची 74 रिक्त पदे,
तंत्रज्ञ एकची 120 तर त्या सोबत तंत्रज्ञ दोन ची 64 आणि वित्त व लेखा विभागातील क्लार्क ची एकूण 260 रिक्त पदांची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविली गेली.
यामुळे मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालिका तथा अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने व मुख्य महाव्यवस्थापक श्री राजु गायकवाड यांचे अनेक परीक्षार्थी उमेदवार हे वेगवेगळ्या माध्यमातून आभार मानत आहे. या दोन्ही वरिष्ठ अधिकारी वर्गाने अत्यंत निष्पक्ष पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविताना कुठल्याही उमेदवारास काही अडचण आली तरी प्रशासन व उमेदवार यांच्या मध्ये कायमच सुसंवाद साधण्या साठी प्रयत्न केला. निवड झालेले उमेदवार हे प्रामुख्याने मध्यमवर्गीय व गरजू घटकातील आहेत. त्यांना नोकरीची अत्यंत गरज होती. हे उमेदवार अनेक वर्षापासून या भरती प्रक्रियेची वाट पाहत रात्रंदिवस अभ्यास करीत होते.कार्यकारी संचालिका श्रीमती सुचिता भिकाने व मुख्य महाव्यवस्थापक श्री राजु गायकवाड या दोन्ही मानव संसाधन मधील वरिष्ठ अधिकारी वर्गास अनेकांनी फोन करून, व्हाट्सऍप द्वारे आभार प्रदर्शित करणारे अनेक मेसेज त्यांना या होतकरू निवड झालेल्या उमेदवारांचे रोजच धडकत आहेत. विद्युत सहायक ची प्रतीक्षा यादी सुद्धा पूर्ण केल्याने गरीब घरातील अनेक विद्यार्थी वर्गास न्याय मिळाला आहे आणि अनेक मध्यमवर्गीय घरात आनंदाचे वातावरण आहे.
कुठलीही भरती प्रक्रिया ही पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडीत असताना त्यासोबत या भरती दरम्यान काही तांत्रिक अडचणी वाटल्यास आमच्याशी संपर्क आणि संवाद साधण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत हेच महापारेषण प्रशासनाने या माध्यमातून दाखवून दिले.
अनेक संघटना पदाधिकारी यांनी सुद्धा या भरती प्रक्रिये बाबत समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने आभार मानले आहेत.यामुळे निकोप आणि सकारात्मक औद्योगिक वातावरण निर्मिती होत असल्याची बाब फील्डवर दैनंदिन विद्युत देखभाली व दुरुस्तीची कामे करीत असताना अनेक कर्मचारी व अधिकारी वर्ग बोलून दाखवत आहेत.







