शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

छत्रपती संभाजीनगरात प्रथमच हनुमान कथेचे आयोजन

---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : शहरात श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था एवं समन्वय परिवार तर्फे दिनांक १० ते १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ७ प.पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या पावन अमृतवाणी द्वारे प्रथमच श्री हनुमान कथेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष भिकमचंद मल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी म्हटले की जनकल्याणच्या भावनेने तीन दिवस ही कथा चालणार आहे. या कथेचे मुख्य यजमान दिलीप बद्रीनारायण सोनी हे आहेत.
हा कार्यक्रम छत्रपती संभाजीगर शहरात तापडिया कासलीवाल प्रांगणात होत आहे. तरी या हनुमान कथेला सर्व समाजातील भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था एवं समन्वय परीवार छत्रपती संभाजीनगर यांच्या
वतीने करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला सर्वश्री दिलीप सोनी,, सीए मदनलाल जाजू, राधेश्याम करवा, ॲड ओमप्रकाश साबू, अॅड अनिल सोनी, बी एन राठी, अॅड सोमनाथ लढ्ढा, , गणेश दरक, सुनील मालाणी, राजेंद्र राठी, श्रीमती रेखा राठी, सौ संगीता चेचाणी, रमेश धूत, गोपाल अजमेरा, ओमप्रकाश काबरा, सुभाष लाहोटी, सौ पद्मा तापडिया, सीए सत्यनारायण जाजू, चंद्रप्रकाश साबु, जगदिश सारडा, शिवप्रसाद तोतला, पंडित विजयकुमार पल्लोड, संजय प्रेमराजजी मंत्री, भुषण मालपाणी, निखील करवा, सीए कृष्णा राठी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment