शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

दादा वामन जोशी मराठी शाळेत १ ली मधील विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न

---Advertisement---

श्रीरामपूर : सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीरामपूर शहरातील दादा जोशी शाळेत बालवाडी व इयत्ता १ ली मध्ये येत्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी बहुसंख्य बालवाडीचे व इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सचिन मुळे यांनी आपल्या भाषणात शाळेच्या सर्व भौतिक सुविधा व शाळा इमारतीसह इतर नुतनीकरण, शाळेची गुणवत्ता, वैशिष्ट्ये याबाबत माहिती दिली. सौ. दिलशाद सय्यद यांनीही आपल्या भाषणात शाळेची गुणवत्ता व इतर शैक्षणिक प्रगतीची माहिती सांगितली. याप्रसंगी शाळेचे चेअरमन ऋषीकेश जोशी, बालवाडी विभागाचे चेअरमन सुशील गांधी, प्रशासकीय अधिकारी भिकाजी कांबळे, बालवाडी विभागाच्या प्रमुख सराफ, ज्येष्ठ पालक यांच्या हस्ते सरस्वती व दादा जोशींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चेअरमन व मुख्याध्यापक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्विकारुन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद क्षीरसागर यांनी केले.याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी अनिल गिरमे, अशोक परदेशी, शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment