श्रीरामपूर : श्रीरामपूर पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शेलार यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती शासनाकडून देण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल किरण शेलार यांचे श्रीरामपूर विभागाचे उत्तर नगर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर नितीन देशमुख यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
श्रीरामपूर येथील किरण शेलार यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती







