शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

लोणी बसस्थानकाचे सर्वेक्षण संपन्न; स्वच्छतेबाबत समितीकडून समाधान व्यक्त

---Advertisement---

लोणी : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत आज दि. ६ एप्रिल २०२६ रोजी लोणी बसस्थानक येथे चौथे सर्वेक्षण अत्यंत उत्साहात पार पडले. या अभियानाद्वारे राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करण्याचा मानस असून, त्या पार्श्वभूमीवर लोणी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष भेट देऊन विविध बाबींची पाहणी केली. या सर्वेक्षणासाठी नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक श्री. क्षीरसागर साहेब, यंत्र अभियंता श्री. शेळके साहेब आणि आगार व्यवस्थापक श्री. प्रशांत गुंड साहेब हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच लोणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री. रावसाहेब पर्वत आणि श्री. नंदकिशोर कानकाटे यांनी समितीला बसस्थानकातील व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली.
सर्वेक्षणादरम्यान समितीच्या सदस्यांनी बसस्थानकाचा परिसर, स्वच्छता गृहे, प्रवासी सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांची बारकाईने पाहणी केली. लोणी बसस्थानकावरील टापटीप आणि स्वच्छता पाहून समितीने विशेष समाधान व्यक्त केले. याप्रसंगी लोणी बसस्थानक प्रशासन आणि लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी आणि लोणी परिसराच्या विकासासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला लोणी गावातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये किसनराव विखे पाटील, रंगनाथ बाळाजी विखे पाटील, अनिलराव विखे पाटील, राहुलजी धावणे पाटील, विजयराव लगड पाटील, भाऊसाहेब विखे पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच लोणीच्या सरपंच सौ. कल्पनाताई मैड, उपसरपंच श्री. गणेशराव विखे पाटील, खंडू पाटील धावणे, राजेंद्र मते पाटील, दिलीप जगन्नाथ विखे पाटील, एन. डी. विखे सर, सोपानराव विखे पाटील, बद्रीनाथ पाटील विखे, ग्रामसेविका मॅडम, माजी सरपंच श्री. बनसोडे भाऊसाहेब, गणेश मधुकर विखे पाटील, जालिंदर विखे पाटील आणि किशोर धावणे पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. बसस्थानकाच्या या उपक्रमाfमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, स्वच्छतेचा हा दर्जा कायम राखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment