शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

दक्षिणमुखी हनुमान मंदिर मित्र मंडळाच्यावतीनेहनुमान जन्मोत्सव साजरा

---Advertisement---


श्रीरामपूर : येथील अमरधाम रोड परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीची सुरुवात पत्रकार अशोक गाडेकर, मनोज आगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली.
यावेळी भाजपच्या गटनेत्या वैशालीताई चव्हाण, नगरसेवक आशिष धनवटे, नगरसेवक दीपक चव्हाण, केतन खोरे, नगरसेविका जयश्री पाटील आणि राजेंद्र पठाडे उपस्थित होते. ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक रवी पाटील, दत्तू जाधव, निसू बेडेकर, संतोष यादव, बबलू यादव, संदीप वराडे, दीपक वाघ, विनोद वाघमारे, किशोर भुतकर, कृष्णा उमाप, अशोक तायडे, मनोज वाघ, अतुल फटांगरे, बलविंदर सिंह, संतोष पगारे, राज चावरीया, रमेश यादव, भरत शिंदे, गजानन जगदने, शरद आडांगळे, गोली यादव, मोहन आडांगळे, संतोष आडांगळे, अखिलेश यादव, भारत शिरसाठ, राम भरत यादव, शुभम यादव, व्यंकटेश आडांगळे, अमोल शिरसाठ, राजेंद्र गजले, उखा लोंढे, परशुराम लोंढे, अशोक सुरंजे, रितेश यादव, मनोज जाधव, युवराज वाघ, गणेश वाघमारे, सागर म्हस्के, कार्तिक मंडवे, शैलेश यादव, अमोल कांबळे, श्याम आडांगळे, भारत शिरसाठ, शंतनू वराडे, संकेत पाटील, संजय छाबडा, उमेश वायकर, प्रणव खरात, सचिन सोमवंशी, मनोज पठारे, विशाल आडांगळे, अमित कुमावत, प्रकाश बैरागी, सोनू बनकर, अमित यादव आणि आणि योगेश आडांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजात, भगव्या पताका आणि जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment