श्रीरामपूर : गुडफ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार या सणाच्या निमित्ताने श्रीरामपूर येथील लोयोला सदन धर्मग्राम, टिळकनगर येथील संत कॅथोलिक चर्च धर्मग्राम, आगाशेनगर येथील डि.पाॅल चर्चच्यावतीने गुडफ्रायडे मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
यावेळी लोयोला सदन धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू यांनी उत्तम शुक्रवारबद्दल माहिती सांगितली आणि तद्नंतर पवित्र क्रुसाची वाटेचा जिवंत देखावाची नाटिका श्रीरामपूर येथील युवकांनी सुंदर असा देखावा सादर केला. लोयोला सदन चर्च श्रीरामपूर, कॅथोलिक चर्च टिळकनगर, डि पाॅल चर्च आगाशेनगर या ठिकाणी देखावा सादर करण्यात आला.
यावेळी श्रीरामपूर धर्मग्रामाचे धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव, रे.फा.रत्नाकार दुशिंग, रे.फा.मॅथ्यु परेरा तसेच लोयोला दिव्यवाणी चे धर्मगुरू रे.फा.अनिल चक्रनारायण, रे.फा.जेकब गायकवाड कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू रे.फा.पिटर डिसोझा, रे.फा. अँड्र्यू जाधव तसेच आगाशेनगर येथील डि पाॅल चर्चचे धर्मगुरू रे.फा. फ्रको, रे.फा.शिजो तसेच संत लुक हाॅस्पिटलच्या सर्व सिस्टर, कनोसा होस्टेलच्या सर्व सिस्टर, टिळकनगर येथील सर्व सिस्टर, डि पाॅल येथील सर्व सिस्टर यासह सर्व भाविक सहभागी झाले होते.
क्रुसाच्या वाटेचा जिवंत देखावाची नाटिका युवक शुभम बारसे, रोहन गायकवाड , शेखर गायकवाड, संदेश रणदिवे, अविनाश रणदिवे, रोहन ठुबे, श्रेयस लोखंडे, समीर साळवे, प्रतिक गायकवाड, स्नेह रणदिवे, प्राजक्ता रणदिवे, प्रणिती त्रिभुवन, लुकस दिवे, शरद सोळस या सर्वांनी सादर केल्यानंतर येशूच्या सात शब्दावर प्रवचन झाले.
उत्सव समितीने सर्वांनी साबुदाण्याची खिचडीचा लाभ घेतला.यावेळी जेम्स पंडीत, राजीव साळवे, सुरेश ठुबे, विलास बनसोडे, बबलू लोंढे, अशोक खंडागळे, दिपक कदम, भाऊसाहेब तोरणे आदींनी सहभाग घेतला.
तसेच चर्च कमिटीचे कमलाकर पंडीत, विजय त्रिभुवन, सुरेश कोळगे, रावसाहेब संसारे,संदीप साळवे,रवि त्रिभुवन,रणजित लोखंडे, रवि लोंढे,लाजरस गायकवाड,पुष्पा कोळगे,लता बनसोडे, निर्मला अमोलिक, शोभा त्रिभुवन तसेच राजेंद्र भोसले, प्रकाश निकाळे, अजय लोंढे, पी. एस. निकम, अक्षय ठुबे या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून सेवा केली.
फोटो मॅटर –
श्रीरामपूर येथील लोयोला सदन चर्च येथे गुड फ्रायडेनिमित्त येशू ख्रिस्ताचा जिवंत देखावा सादर केला. (छाया -अमोल कदम)







