शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मुस्लिम समाजातील मुलींनी इरम अन्सारीचा आदर्श घ्यावा – आहेर

---Advertisement---

इरमने प्राप्त केले आंतरराष्ट्रीय प्रकाशन पेटंट

श्रीरामपूर : येथील इरम तजमुलहक अन्सारी हिने आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकाशन पेटंट प्राप्त करून श्रीरामपूरच्या लौकिकात भर घातला आहे.तिचा आदर्श घेऊन मुस्लिम समाजातील मुलींनी सुद्धा उच्च शिक्षण घ्यावेव आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करावी. इरम ने मिळविलेले यश समाजातील इतर मुलींना निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल.या कामी तिला प्रोत्साहन देण्याचे काम तिच्या पालकांनी केले आहे. त्यामुळे ते देखील कौतुकास पात्र आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रदीप आहेर यांनी केले.
इरम अन्सारी या संजीवनी एम. फार्मसी च्या विद्यार्थीनीने संजीवनी ॲडवर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग सिस्टिमशी संबंधित चॅटबॉट आधारित प्रणाली या विषयावर संशोधनात्मक पोस्टर सादर केले.या पोस्टरच्या माध्यमातून तिला अन्वेशन या आंतरराष्ट्रीय संशोधनात्मक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.तिने तयार केलेल्या या प्रणालीचे कॉपीराईट नोंदणी केली असून पेटंट प्रकाशन प्राप्त झाले.भविष्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी ही प्रणाली
उपयुक्त ठरणार आहे.
इरम ने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचा किशोर शिंदे मित्र मंडळातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी आहेर बोलत होते.
इरम अन्सारी हिने तयार केलेल्या पोस्टरला यापूर्वी महाविद्यालय,विभागीय, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय अविष्कार पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत यश मिळाले.त्याचा परिणाम म्हणून तिला आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले संशोधन मांडण्याची संधी मिळाली आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण, नगरसेवक शाम आढागळे,जावेद हमीद शेख,कलीम कुरेशी,हाजी शरीफखान पठाण,किशोर शिंदे,योगेश शिंदे,दिनेश शिंदे,त्याच्यामुळे अंसारी, सादिक शेख,फारुक अन्सारी,ईरशान पठाण,सलीम शाह आदि उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इरम चा सत्कार करण्यात आला.मुस्लिम समाजातील मुली उच्च शिक्षणामध्ये मागे असतात.परंतु इरमच्या या यशाने त्यांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल.वैद्यकीय क्षेत्रामध्ये मुस्लिम मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे.तिचा आदर्श घेऊन भविष्यात समाजातील इतर मुलींनी सुद्धा उच्च शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.शेवटी किशोर शिंदे यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment