शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

प्रत्येकाने धर्म व वारकरी संप्रदाचा अभिमान बाळगावा – आ. खताळ

---Advertisement---
  • संगमनेर खुर्द येथे हनुमान जयंतीदिनी अखंड हरिनाम सप्ताहस प्रारंभ

संगमनेर : अमेरिका, इराण, इराक आणि इस्रायल यांसारख्या देशांमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीकडे जगाचे लक्ष लागले असताना भारत ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि साधुसंतांच्या संस्कारांची भूमी आहे देश आणि धर्म टिकला तरच देश प्रगती करेल, यासाठी प्रत्येकाने हिंदू धर्माचा व वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगावा, असेही त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कीर्तनरूपी पुष्प सुनील महाराज पवार यांनी गुंफले. यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना आ खताळ बोलत होते.या कार्यक्रमास संगमनेर खुर्दचे माजी सरपंच भाऊ साहेब गुंजाळ, उपसरपंच गुलाब शेख शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख निलेश गुंजाळ संकेत खुंळे सचिन पावबाके लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे विकास जाधव.गौरव आरणे. दिपक आव्हाड.अजित बलसाने. प्रसाद आव्हाड. सौरभ आरणे. पंढरी बलसाने गोरख बलसाने. ऋषिकेश बलसाने. अभिषेक बलसणे. राजू आव्हाड,विलास आव्हाड. यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. खताळ म्हणाले की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जणू साक्षात बजरंग बली पवनपुत्र हनुमानच आपल्यात आल्याचा अनुभव येतो. अखंड हरिनाम सप्ताह सारख्या धार्मिक कार्यक्रमातून अध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि साधुसंतांच्या विचारांना उजाळा मिळतो.” सप्ताहा च्या आयोजनात सप्ताह कमिटीने अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळा च्या युवकांचा सहभाग घेऊन सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम केले असल्याचा विशेष आनंद आहे देव-धर्माचा आशीर्वाद भक्तिभावाने घेतला आणि चांगले कर्म केले, तर त्याचे फळ निश्चित मिळते. मी स्वतः वारकरी संप्रदायातील कुटुंबातून आलो असून माझी आई वारी करते. तिचे संस्कार माझ्यावर झाले आहे आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मला या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करून विकासकामे पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे,” वारकरी परंपरे तील संस्कारांमुळेच हिंदू धर्माविषयी अभिमान असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले

संगमनेर खुर्द येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचे तसेच सप्ताहाचे पहिले पुष्प गुंफणारे सुनील महाराज पवार यांचा क्रेनच्या साह्याने हार घालून सन्मान करण्यात आला  त्यावेळी उपस्थित भावीक चांगलेच भारावून गेले होते

संगमनेर तालुक्यात नुकत्याच झाले ल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतककर्या च्या पिकांचे तातडीने सरसकट पंच नामे करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कम उभे आहे
– श्री अमोल खताळ पाटील, आमदार संगमनेर विधानसभा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment