शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

विनोद अहिरे यांचे समाजाभिमुख कार्य – बिपीनदादा कोल्हे

---Advertisement---

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद अहिरे यांनी त्यांचे वडील कै. मारूती अहिरे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला (धामोरी) सुसज्ज अद्यावत रूग्णवाहिका भेट दिली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. विनोद अहिरे यांचे कार्य समाजाभिमुख असल्याचे ते म्हणांले.
प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी प्रास्तविक केले. श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणांले की, समाजाचं आपण देणं लागत असतो. रूग्णसेवा हिच इश्वर सेवा आहे. कोरोना महामारीत आपण सर्वांनी अनुभवलं. रूग्णांना तात्काळ आरोग्यसुविधा मिळाव्या यासाठी रूग्णवाहिकेची नेहमीच गरज भासते. श्री. विनोद अहिरे यांनी नेमकेपणांने ग्रामिण भागात ही सुविधा उपलब्ध करून देत समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपुर्ण कोपरगांव विधानसभा मतदार संघात संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने फिरता दवाखाना मोबाईल व्हॅन थेट रूग्णांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देत त्यातुन समाजकार्य साधण्याचा प्रयत्न केला आहे असेही बिपीनदादा कोल्हे शेवटी म्हणाले.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, विलासराव माळी, राहुल वाणी आदि उपस्थित होते. शेवटी संचालक विलासराव माळी यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment