शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

गौतम सहकारी बँकेची नेत्रदीपक कामगिरी

---Advertisement---
  • २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ४.१४ कोटींचा नफा.

कोळपेवाडी : सहकार क्षेत्रातील जिल्ह्यात अग्रगण्य संस्था असलेल्या गौतम सहकारी बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोषदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेला ४१४.०६ लाख रुपये ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून निव्वळ नफा १३५.४८ लाख झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन संजय आगवन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.
गौतम बँकेने गेल्या काही वर्षांत विकासाच्या दिशेने यशस्वी घौडदौड सुरु आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक ताळेबंदानुसार बँकेचा निव्वळ १५% ने वाढून १ कोटी ३५लाख ४८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. तर स्थूल नफ्यात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ७४% ची मोठी वाढ झाली आहे. ही आकडेवारी बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीची साक्ष देत आहे. बँकेने केवळ नफ्यातच नाही तर एकूण व्यवसायातही मोठी झेप घेतली आहे.
बँकेच्या चोख व्यवहार पद्धतीमुळे ठेवीदारांनी बँकेवर अतूट विश्वास दाखवला असून बँकेकडे एकूण १४८ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी असून चालू वर्षी बँकेने ८९ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बॅकेची गूतवणुंक ७७०४.२७ लाख असून सी.आर.अ.आर १९.३८% आहे. पी.सी.आर २१६.७३% आहे. नेटवर्थ १३९८.६१ लाख आहे या बँकेचे एकूण व्यवहार २३८०६.४८ लाखांचे च्या जवळपास पोहोचले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर बँकेने आपला नेट एनपीए सलग दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी ०% राखण्यात यश मिळवले असून ग्रॉस एनपीए सुद्धा ५%चे आंत ४.४२% पर्यंत खाली आणला आहे. वार्षिक सभेत मान्यता घेऊन सभासदांना लाभांश वाटप करण्यात येणार आहे. बॅकेस या आर्थिक वर्षात विविध प्रकारचे राष्ट्रीय व देश पातळीवरील पुरस्कार मिळविलेले आहेत.बँकेने केलेल्या दिमाखदार कामगिरीबद्दल मा.आ.अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व अधिकारी , कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांचे बँकेला मिळणारे नियमित मार्गदर्शन आणि चेअरमन, व्हा.चेअरमन व व्यवस्थापन समिती तसेच संचालक मंडळाचे योगदान व जोडीला बँकेच्या प्रत्येक शाखेतील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळेच एवढे मोठे यश मिळवता आले आहे. संचालक मंडळाने वेळोवेळी दाखवलेला विश्वास आणि दिलेले पाठबळ यामुळे बँक प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेणे सोपे होवून सहकारातून समृद्धी हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या गौतम सहकारी बँकेने येणाऱ्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेच्या जोरावर अधिक प्रगती करण्याचा संकल्प केलेला आहे. – प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment