- झाडे, विजेच्या तारा पडल्याने प्रचंड नुकसान
सोनई, – वार्ताहर संदिप दरंदले : सोनई ता. नेवासा येथे दि. १एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.यामुळे सोनई परिसरात गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.सोनई परिसरात दि. ३०मार्च रोजी रात्री हलक्या पावसाच्या सरी पडल्या होत्या. पण १एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहाला अचानक जोरदार वारे वाहण्यास सुरवात झाली. यानंतर गारांचा पाऊस पडण्यास सुरवात झाली. सुमारे एक तास पावसाचा जोर कायम होता. यामुळे सोनई परिसरात सध्या गहू सोंगणी सुरु आहे. तर काही शेतकऱ्याचा गहू शेतात उभा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या गहू व इतर पिकांचे नुकसान झाले.सोनई, शनिशिंगणापूर, मुळा कारखाना आदी भागात झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानी बाबत शासनाने पंचनामे करावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
चक्रिवादळासह विजेचा कडकडाट शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
नेवासे तालुक्यातील पश्चिमेला मुळाथडी परीसरात बुधवार दि.१ रोजी सायंकाळी ६च्या दरम्यान पानेगांव मांजरी, शिरेगांव,खेडलेपरमानंद करजगांव,वाटापूर आदी गावामध्ये अचानक आलेल्या चक्रिवादळ विजेचा कडकडाट पाऊसाने प्रचंड नुकसान झाले असून काढणीला आलेला गहू, कांदा, मका, हरभरा चाऱ्यांचे पिकं हातातोंडाशी आलेला घास बळिराजाचा हिरावला गेला आहे. तीन दिवसांपूर्वी अल्पशा प्रमाणात पाऊस झाला होता त्यामध्ये शेतकऱ्यांचे कमी प्रमाणात नुकसान झाले होते परंतु आजच्या पाऊसाने प्रचंड नुकसान झाले असून काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा अक्षरश: झोपले आहे. वादळीवाऱ्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.








