शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मंगळवारी वडाळा महादेवला रेणुकादेवी जन्मोत्सव दशकपूर्ती सोहळा

---Advertisement---

श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुकादेवी आश्रमात चैत्र वद्य पंचमी अर्थात मंगळवार दि ७ एप्रिल २०२६ रोजी श्री रेणुकादेवी जन्मोत्सव दशकपूर्ती सोहळा आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य विश्वस्त मातोश्री नलिनीदेवी जोशी यांनी दिली आहे.
आश्रमाचे संस्थापक मौनयोगी सदगुरू रेवणनाथ महाराज यांच्या आज्ञेनुसार व श्री रेणुका महात्म या ग्रंथातील प्रमाणानूसार चैत्रातील वद्य पक्षातील पंचमी या दिवशी
रेणुराजा व माता भोगावतीच्या ऊदरी रेणुका देवीचा जन्म झालेला आहे. या दिवशी सकाळी राजराजेश्वरी रेणुका देवी अभिषेक महापूजा व द्राक्ष फळ अर्चन पूजा होणार आहे. तसेच त्यानंतर रामकृष्णनगर महिला भजनी मंडळाचे भगवती भजन होणार आहे. ११ वाजून ११ मिनिटांनी पंचोपचार, मंत्रअक्षत व शांतीसुक्त पठण , जन्म पाळणा गायन होईल माध्यन नैवेद्य आरती नंतर तांबुल प्रसाद वितरण होणार आहे. भगवती रेणुका जन्मोत्सव निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका ऊपासना परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे .

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment