श्रीरामपूर : येथील हिंद सेवा मंडळाच्या भि. रा. खटोड कन्या विद्यालयास नासिक विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या विकास निधीतून नुकताच प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरिश मुंढे,तालुका प्रमुख अजित देठे, तालुका प्रतिनिधी अक्षय थोरात व शशिकांत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचे चेअरमन दत्तात्रय साबळे प्राचार्या डॉ मंगला भोसले पर्यवेक्षिका मंगला डोळस व विद्यार्थीनींनी यांच्याकडे प्रोजेक्टर सुपूर्द केला. या अगोदरही आमदार दराडे यांनी शाळेस संगणक, प्रिंटर तसेच प्रयोगशाळा साहित्य भेट दिले आहे.
यावेळी शशिकांत थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. चेअरमन दत्तात्रय साबळे यांनी आपल्या भाषणात आमदार दराडे यांना विशेष धन्यवाद दिले. या प्रोजेक्टरचा उपयोग अध्ययन व अध्यापन करण्यासाठी होईल असे ते म्हणाले तसेच आगामी काळात देखील शाळेय विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
सुत्रसंचालन सेवक प्रतिनिधी आदिनाथ जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा सतिश म्हसे यांनी केले.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आमदार दराडे यांच्या निधीतून खटोड कन्या शाळेस प्रोजेक्टर भेट








