शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

आडगाव बुद्रुक येथील खंडोबाची गुरुवार पासून यात्रा

---Advertisement---

राहाता : राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रुकचे ग्रामदैवत खंडोबा महाराजांचा यात्रा उत्सव
गुरुवार दि.२ एप्रिल पासून सुरु होत असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आडगांव ग्रामस्थांनी केले.

दोन दिवसीय यात्रा उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामदैवत खंडोबा महाराज हे नवसाला पावणारे देवस्थान असल्याने जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. यात्रेनिमित्त मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त सकाळी गंगेच्या पाण्याची आणि काठीची मिरवणूक, सायंकाळी पालखी मिरवणूक, शोभेच्या दारूची,दुपारी २ वाजता बैलगाडा शर्यत,फटक्यांची आतषबाजी मनोरंजनासाठी लावण्यफुलवंती शबमन पुणेकर यांचा लावणीचा सदाबहार कार्यक्रम तर शुक्रवारी कुस्त्यांचा हंगामा, आदी कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेवून यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment