मालुंजा बुद्रुक : श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील जागरूक देवस्थान रेणुका मातेचा यात्रोत्सव रविवार, दि. ५ एप्रिल पासून सुरू होत आहे. यात्रेनिमित्त ग्रामस्थांची बैठक होवून या बैठकीत यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी रणजित दिनकर बडाख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
५ एप्रिलपासून सुरू होणारा हा यात्रोत्सव ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीचे सरपंच तथा प्रशासक अच्युतराव पाटील बडाख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची बैठक पार पडली, या बैठकीत सर्वानुमते यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी रणजित दिनकर बडाख यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी अशोक बाळासाहेब गायकवाड, कार्याध्यक्षपदी किरण गोपीनाथ गायकवाड व कमिटीत नवीन सदस्यांचीही निवड करण्यात आली. यात्रेनिमित्त गंगेवरून कावडीयांनी आणलेल्या पाण्याची गंगाजल कावड मिरवणूक काढण्यात येणार आहे. देवदैवतांना अभिषेक, देवीचा मुखवटा मिरवणूक व यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा जंगी हगामा होणार असून या कुस्त्यांच्या हगाम्यामध्ये जिल्हा व जिल्ह्याबाहेरील नामवंत मल्ल सहभाग घेणार आहेत. यात्रेनिमित्त मंदिर परिसर सुशोभिकरण, लाईटच्या माळा आदी कामे सुरू आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ, तरुण मित्रमंडळ, आदी, मान्यवर उपस्थित होते. यात्रेचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभा घ्यावा, असे आवाहन मालुंजा बुद्रुक ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
रेणुका माता यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी रणजित बडाख








