शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

कत्तल करून गोमांस विकत असल्याचे तीन ठिकाणी पोलिसांची कारवाई

---Advertisement---
  • ८५० किलो गोमांसासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड नं.२ मधील ३ ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विकत असल्याचे ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता या छाप्यामध्ये पोलिसांनी सुमारे ८५० किलो गोमांसासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वॉर्ड नं. २ मधील मौलानाअली चौक येथे जाऊन पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी घराच्या अडोशाला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल गुन्हा केलेल्या गोवंशीय जनावरांचे मांस कापताना आणि विकताना आढळून आले. या ठिकाणी पोलिसांनी ३०० किलो गोमांस आणि सुरा असा ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करून अदनान गुलाब कुरेशी याच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई वॉर्ड नं.२ मध्येच करण्यात आली. या ठिकाणाहून मोटारसायकलवर एकजण गोवंशीय जनावरांचे मांस घेवून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून वॉर्ड नं.२ मधील उर्दू शाळा नं.५ येथे एक गाडी थांबवून त्याची झडती घेतली असता मोटारसायकलला लटकवलेल्या गोण्यांमध्ये १५० किलो गोमांस आढळून आले. या गोमांसासह पोलिसांनी मोटारसायलसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून इब्राहीम कुरेशी याच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी कारवाई वॉर्ड नं.२ मध्येच करण्यात आली. मौलानाअली चौक येथून एका टेम्पोतून गोवंशीय जनावरांचे मांस तसेच गोवंशीय जनावरे घेवून जाणार असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस या चौकाच्याजवळ गेले असता काही वेळाने टेम्पो क्र. एमएच १२ एनएक्स २१८७ हा पोलिसांना दिसला. तेव्हा पोलिसांनी सदर टैम्पो अडवून त्याची तपासणी केली असता त्यात ४० हजार रू.किंमतीची एक जिवंत गाय, ५ हजार रूपये किंमतीचा गोऱ्हा, ८० हजार रू. किंमतीचे ४०० किलो गोमांस असा टेम्पोसह एकूण ४ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आवेद मुख्तार कुरेशी, सोमनाथ दिपक कुऱ्हाडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील सर्व प्रकरणांचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment