शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जीवनात संयमी वृत्ती हवी : प्रविणऋषीजी महाराज

---Advertisement---

 श्रीरामपूर : जीवनामध्ये संयमी वृत्ती असलीच पाहिजे, राग नको. तरच जीवन आनंदी व सफल होईल. दुसर्‍यांना क्षमा करावी. दुसर्‍यावर प्रेम कराल तर तुम्हाला दुसर्‍याकडून प्रेम मिळेल, असे विचार अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर पु. प्रविणऋजी महाराज यांनी प्रवचनातून व्यक्त केले.

श्रीरामपूरच्या जैन स्थानकामध्ये उपाध्याय प्रवर पु. प्रविणऋषीजी त्यांचे शिष्य पु. तिर्थेशऋषीजी व राष्ट्रसंत आचार्य पु. आनंदऋषीजी यांच्या अज्ञानुवर्तीनी पु. प्रितीदर्शनाजी व त्यांच्या 5 सुशिष्या यांचे वास्तव असून श्री भगवान महावीरांच्या उपदेशपर बोलतांना पु. प्रविणऋषीजी प्रवचनातून बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, राग हा माणसाचा शत्रु आहे. तो जीवन बरबाद करतो. मन शांत असेल तर जीवनातील सर्व प्रश्‍न सुटतात. संकटातही मार्ग सापडतो. रोगावर औषध घेण्यापेक्षा रोग होऊच नये. म्हणून प्रयत्न करा. सर्वाची कारणे शोधा व राग मुळापासून नष्ट करा. पाप आणि दु:ख यांना दूर ठेवावे. संत ज्ञानेश्‍वरांनी मानव जातीच्या कल्याणासाठी बंधुभाव वाढीसाठी व माणसातील वाईट वृत्ती नष्ट होण्याकरिता पसायदान मागितले. तीन सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे. ज्ञानेश्‍वरांचे कार्य आदर्श आहे, असे त्यांनी प्रवचनातून स्पष्ट केले.

यावेळी तिर्थेशऋषीजी यांनी स्तवनमधून प्रेरणा दिली. तर प्रितीदर्शनाजींच्या शिष्या प्रथमेशदर्शनाजी यांनी भगवान महावीरांचे जीवनावर भजन म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले. दीपक संघवी यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धीसुधाजी व त्यांच्या शिष्यांचे संगमनेर येथील मुमुक्षु मधुरा महेशजी भंडारी या दीक्षा अंगिकारणार असून दीक्षाचे मंगळवार सकाळी 7 वा. श्रीरामपूर मध्ये आगमन होणार आहे. तसेच आज्ञापत्र भंडारी परिवाराच्यावतीने संत व साध्वींच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment