श्रीरामपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन थोरात यांच्या सह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.यावेळी,जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ५१ वृक्षारोपण करण्याची मोहिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष,सामजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ,श्री स्वामी समर्थ शैक्षणिक संस्था पुणे येथील व उक्कलगावचे भुमिपूत्र डॉ.किशोर आण्णासाहेब थोरात यांच्या कुंटूबियाच्यावतीने तसेच, उक्कलगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘एक झाड दत्तक घ्या’ ‘पृथ्वी वाचवा भविष्य घडवा’ या योजनेचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम नदीकाठ परिसरात व ग्रामपंचायत आवारात कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनिल थोरात,दिलीप थोरात,शरद थोरात सोसायटीचे व्हा.चेअरमन शरद थोरात,युवराज थोरात, सुरेश जगधने, आदिनाथ जगधने, सुभाष थोरात, रोहिदास गोळे, भास्कर थोरात, नितीन फुलपगार, सखाहरी थोरात, विशाल गायकवाड आदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासह ग्रामविकास अधिकारी सुभाष पवार, ग्राममहसूल अधिकारी श्री.धरम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांना अनेक वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.किशोर थोरात म्हणाले की,सन १९७२ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे.परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चार जणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. या परिसरातील वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केले पाहिजे.असा विश्वास श्री.थोरात यांनी व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उक्कलगाव येथे ५१ वृक्षांची लागवड







