शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सोनईत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक गट शेतीचे धडे

---Advertisement---

सोनई : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पाणी व्यवस्थापन व गट शेतीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने पाणी फाउंडेशनच्या वतीने “शेती क्षेत्रातील व्यावसायिक आव्हाने व संधी” या विषयावर विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले.ही बैठक बुधवार दि. २० मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सोनई सोसायटी हॉल येथे पार पडली. यावेळी सोनई परिसरातील शेतकरी बांधव तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी ड्रोन पायलट सौ.संगीता अशोक लाटे यांनी प्रास्ताविकातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक फायदेशीर कशी बनवता येईल, याविषयी माहिती दिली. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने गट शेती करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पाणी फाउंडेशनच्या तज्ज्ञ ज्योती ठाकरे मॅडम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना स्मार्ट फार्मिंग, आयओटी सेन्सर्स, पाणी व्यवस्थापन, डेटा अ‍ॅनालिटिक्स यांसारख्या आधुनिक संकल्पनांची सविस्तर माहिती दिली. तसेच गट शेती हा एक सक्षम व्यावसायिक पर्याय ठरू शकतो, यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.बैठकीत शेतकऱ्यांच्या खर्चात बचत, उत्पादनात वाढ, योग्य पाणी नियोजन, एकत्रित औषध खरेदी, उत्कृष्ट पीक व्यवस्थापन आणि स्मार्ट शेती यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. “चला, आधुनिक शेतीकडे वाटचाल करूया” हा संदेश देत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.हा उपक्रम नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनीताताई शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पाणी फाउंडेशनच्या फिल्ड मॅनेजर ज्योती ठाकरे मॅडम, ड्रोन पायलट सौ. संगीता अशोक लाटे मॅडम, कृषी अधिकारी ढोकणे, पंचायत समितीचे अर्जुन सोनवणे तसेच गणेश मेथे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पाणी फाउंडेशनच्या गटशेती उपक्रमाच्या ग्रुप प्रमुख वनिता यादव यांनी सोनई येथे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सौ.संगीता लाटे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच दरवर्षी सोनई परिसरातील शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. ग्रामीण भागातील शेती व्यवसाय अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सौ.लाटे यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment