संगमनेरला युवासेनेच्या रोजगार तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण संगमनेरला एमआयडीसी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असून एमआयडी 0सीला मंजुरी मिळाली आहे लवकरच एम आय डीसी बाबतचे नोटिफिकेशन निघणार असून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महायुती व युवासेना कटिबद्ध असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे युवासेनेच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते यावेळी व्यासपीठावर युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम वाघ, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, मंजाबापू साळवे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, महिला उपजिल्हा प्रमुख दिपाली वावळ, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, डॉ अमोल कर्पे, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या रोजगार मेळाव्यासाठी ६०० तरुण-तरुणींनी मुलाखती दिल्या त्यापैकी १२५ तरुणी तरुणींनी तरुणीची प्राथमिक निवड करण्यात आली तर काहींना जागेवर ऑफर लेटर देखील देण्यात आले. आमदार खताळ म्हणाले की, संगमनेरमधील तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार आणि कौशल्यानुसार नोकरी मिळावी, यासाठी शिवसेना युवासेना कटिबद्ध आहे . ग्रामीण भागातील तरुणांनाही रोजगाराच्या संधी मिळावी या उद्देशाने पारेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या उद्योगात सुमारे ६०० ते६५० युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संगमनेरमधील उद्योजकांनीही पुढाकार घेत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.या रोजगार प्रक्रियेसाठी तब्बल १ हजार ,८०० युवकांनी नोंदणी केली. त्यापैकी अनेकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. बीएससी, एमएससी, बीसीए, आयटीआय तसेच इतर विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकां साठी लहान-मोठ्या स्वरूपाच्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.प्रत्येकाने केवळ नोकरीच करावी असे नाही, तर काही तरुणांनी उद्योजक बनून इतरांना रोजगार द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सहकारी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून इच्छुक तरुणांना उद्योग क्षेत्रात उतरता यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात कौशल्याधारित रोजगाराला प्रोत्साहन दिले जात आहे आय टी आय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विशेष संधी उपलब्ध होत असल्याचेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.







