शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सात्विक दातीर यशस्वी

---Advertisement---


अहिल्यानगर : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSS) इयत्ता ८ वीमध्ये श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सवेडी येथील विद्यार्थी सात्विक निशांत दातीर याने २३४ गुण (७८ टक्के) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळा परिसरासह शैक्षणिक क्षेत्रात त्याचे सर्वत्र कौतुक होत असून दातीर व कजबे परिवाराकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सात्विकच्या या यशाने विद्यार्थ्यांसमोर मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर यश मिळविता येते, याचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे.
सात्विक दातीर हा अभ्यासात सातत्य राखणारा तसेच त्याने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय रगबी या खेळात जिल्हाचे प्रतिनिधित्व केले होते.शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्याने नियमित अभ्यास, सराव आणि नियोजनबद्ध तयारी केली होती. त्याच्या या यशामागे श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सवेडी येथील शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका वसुंधरा जोशी यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला असून उपमुख्याध्यापक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनीही सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या परीक्षेच्या तयारीदरम्यान शिक्षक अनुराधा शास्त्री आणि भोराजी पथवे यांनी सात्विकला विषयानुरूप मार्गदर्शन करत त्याचा आत्मविश्वास वाढविला. तसेच महेश डाळिंबकर सरांचेही त्याला विशेष मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासपद्धती, नियमित चाचण्या आणि शंकानिरसनामुळे सात्विकला परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविणे शक्य झाले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळेकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.
सात्विकचे वडील पत्रकार निशांत वसंतराव दातीर आणि आई इंजिनियर शोभा निशांत दातीर यांनी मुलाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. मुलाने अभ्यासात सातत्य ठेवून मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सात्विकच्या या यशाबद्दल विधापरिषदेचे सभापती ना. प्रा राम शिंदे शाळेचे शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment