मुंबई : कर्नाटक राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते मुरुगेश निराणी तसेच ‘निराणी शुगर्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक विशाल एम. निराणी यांनी आज मुंबई येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार करून प्रकृतीची आणि कुशलतेची आस्थेने विचारपूस केली.
या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान ग्रामीण विकासाला औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून अधिक गती देणे तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील आर्थिक व औद्योगिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि पर्यावरणपूरक व शाश्वत आर्थिक विकास साध्य करण्याच्या उद्देशाने विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या आराखड्याचा आढावा घेण्यात आला.
तसेच ग्रामविकास आणि कृषी-आधारित उद्योगांचा विस्तार, साखर व उप-उत्पादन उद्योगाच्या वाढीस चालना, औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासंदर्भातही विशेष चर्चा झाली.
औद्योगिक प्रगती आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने दिलेल्या सकारात्मक सहकार्याबद्दल तसेच या महत्त्वपूर्ण भेटीसाठी माजी मंत्री मुरुगेश निराणी यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.
कर्नाटक-महाराष्ट्र औद्योगिक सहकार्याला चालना; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा







