शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी राधिका गव्हाणे बनली हर्बल उद्योजक

---Advertisement---

कोल्हार :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत नुकतेच मुंबई, बांद्रा येथे सपन्न झालेल्या प्रदर्शनात सप्तशृंगी महिला बचत गटाच्या “राधे राधे गौधूपबत्ती” स्टॉलला नाविन्यपूर्ण उपक्रम व सर्वाधिक विक्रीबद्दल सन्मानित करण्यात आले.यावेळी ‘उमेद’चे मा. निलेश सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून राधिका गव्हाणे यांना सन्मानित केले.हा सन्मान महिला बचत गटाच्या कार्याला मिळालेली एक प्रेरणादायी पावती मानली जात असून, ग्रामीण महिलांच्या स्वावलंबन, उद्योजकता आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी हा अभिमानास्पद क्षण ठरला आहे.देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ‘अत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया’ या दुरदर्शी संकल्पनेला अनुसरुन तसेच त्यांची गोमातेबद्दल असलेली कृतज्ञता या उपक्रमातून निश्चितच राधिका हिने उद्योग पूर्णत्ववाला नेण्याचा प्रयत्न केला आहे.पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी राधिका गव्हाणे हिने देशी गाईच्या शेणापासून चार सुगंधीत हर्बल गौधूपबत्ती तयार करण्याचा उद्योग तसेच गायीच्या शेणापासून श्री गणेशमुर्ती, पणती, पारंपारिक गोव-या इ. उत्पादने सप्तशृंगी महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केली जातात. या उद्योगामुळे पाच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. सन २०२४ मध्ये घरगुती स्तरावर सुरू झालेला हा व्यवसाय आज ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यभर प्रसिद्ध झाला आहे.शिक्षणासोबतच लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, व संस्थेच्या सी.ई.ओ. डॉ.सुष्मिताताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आयोजित केलेल्या बिल्डिंग प्रवरा “स्टुडंट एक्स्पो” मधील सहभागामुळे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांचे प्रेरणेने राधिकाला उद्योजकतेची प्रेरणा मिळाली, अशी माहिती तिचे वडील श्री.राजेश गव्हाणे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment