शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

एनपीटीईएल परीक्षेत प्रवरा अभियांञिकीच्या कु. सानिका लव्हाटेचे यश; संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार

---Advertisement---

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थिनी कु. सानिका सोमनाथ लव्हाटे हिने राष्ट्रीय स्तरावरील एनपीटीईएल (NPTEL) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. “इंटरनेट क्राईम्स अँड सायबर सिक्युरिटी” या अभ्यासक्रमामध्ये तिने १०० पैकी १०० गुण मिळवत शतप्रतिशत यश मिळविले आहे.अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी माहिती देत विद्यार्थिनीच्या मेहनतीचे आणि गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच या यशाबद्दल संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता ताई विखे पाटील यांच्या हस्ते कु. सानिका लव्हाटे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.आपल्या यशाचे श्रेय देताना कु. सानिका हिने महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, शैक्षणिक वातावरण आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले.विशेष म्हणजे, कु. सानिका लव्हाटे ही प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सीमा लव्हाटे तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक प्रा. सोमनाथ लव्हाटे यांची कन्या आहे. विद्यार्थिनीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे,प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने आदींनी अभिनंधन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment