शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

स्टडी सेंटर व बहुउद्देशीय सभागृहाची उभारणी करणार – आ.हेमंत ओगले

---Advertisement---

महाराष्ट्र पठाण समाज सेवा संघतर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

श्रीरामपूर – मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे त्यासाठी करिअर गायडन्स सारखे प्रोग्राम मार्गदर्शक ठरतात.नगरपालिका निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरच मिल्लत नगर परिसरामध्ये पठाण सरांच्या मागणीनुसार बहुउद्देशीय सभागृह व स्टडी सेंटर ची उभारणी करण्यात येईल.यासाठी शासनाच्या योजना व आमदार निधीतून भरघोस सहकार्य करण्यात येईल याचा सुरुवात म्हणून दहा लाख रुपयांचा निधी मी आजच जाहीर करीत आहे असे प्रतिपादन आमदार हेमंत तात्या ओगले यांनी केले.महाराष्ट्र पठाण समाज सेवा संघ यांच्या वतीने श्रीरामपूर शहरात प्रथमच भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 10वी, 12वी, डिप्लोमा, डिग्री तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ओगले बोलत होते.याप्रसंगी मुफ्ती रिजवान,नगरपालिका काँग्रेस पक्षाचे गट नेते मुजफ्फर शेख,नगरसेवक अंजुमभाई शेख,मुन्ना पठाण,जावेद शेख,शाहिद कुरेशी,कलीम कुरेशी,माजी नगरसेवक मुख्तार शाह,साजिद मिर्झा,शहर काजी मौलाना अकबर अली,मोहम्मदरफीक शेख, डॉक्टर मोहसीन शेख,डॉक्टर तोफिक शेख,सुप्रसिद्ध करियर कौन्सिलर अनिस कुट्टी,इरफान सय्यद, डॉ.दीपेश रसाळ, डॉ.एहतेशामुद्दीन सय्यद,गोविंद ठोंबरे, एहसान सय्यद,हाफिज शेख,रिजवान शेख या विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी सूर्यदत्ता सायबर सिक्युरिटी कॉलेजचे माजी प्राचार्य अरिफ शेख होते. संरक्षण सेवा,वैद्यकीय क्षेत्र, पोलीस सेवा,अभियांत्रिकी, नागरी सेवा, तसेच करिअर काउन्सेलिंग यासह अनेक क्षेत्रांतील संधींबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली.या कार्यक्रमात विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या पद्धती, शैक्षणिक संधी, योग्य विषय निवड, तसेच भविष्यातील विविध करिअर मार्ग याबाबत विद्यार्थी व पालकांचे प्रश्न सोडविण्यात आले. ग्रामीण आणि उपनगरातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची दारे खुली व्हावीत, हा संघाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र पठाण समाज सेवा संघाचा हा उपक्रम शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या कौतुकास्पद ठरला. याप्रसंगी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या ३८ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रस्ताविक पठाण सेवा संघाचे राज्य अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले.सूत्रसंचालन रज्जाक पठाण यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष रफिक पठाण यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री.हाजी शरीफखान पठाण, मोहसीन पठाण,अकबर पठाण,अमजद पठाण,फिरोज पठाण,जुनेद पठाण,अशपाक पठाण भैय्या,रफिक शफिक पठाण,अरबाज पठाण,जावेद याकूब पठाण,फिरोज युसुफ पठाण,इम्तियाज पठाण,भैय्या पठाण,रियाज पठाण,शोएब पठाण, इसाक पठाण,एम एम पठाण,रियाज अब्दूल पठाण,राजमोहम्मद पठाण,ॲड मोहसीन पठाण,इमदाद पठाण,अबूजर पठाण,रफिक शरीफ पठाण समद पठाण,जुलेखा पठाण,कहेकशा पठाण,अरिबा पठाणआदींनी विशेष परिश्रम घेतले.चौकटसव्वा पाच तास चाललेल्या या कार्यक्रमात मुस्लिम समाजाचे विद्यार्थी विशेषता मुली व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विविध क्षेत्रातील तज्ञांनी यावेळी करिअर साठी असलेल्या अनेक प्रकारच्या संधी समजावून सांगितल्या.श्रीरामपूर शहरात मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी भव्य असा हा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला त्यामुळे अनेकांनी पठाण सेवा संघाला धन्यवाद दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment