लोणी :राहता तालुक्यात कृषी विभाग, पाणी फाउंडेशन व उमेद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “सत्यमेव जयते फार्मर कप” स्पर्धेअंतर्गत शेतकरी गट बांधणीचे व्यापक काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक ९६ शेतकरी गटांची बांधणी राहता तालुक्यात करण्यात आली असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या उपक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर अक्षय गोसावी तसेच तालुका कृषी अधिकारी राहता आबासाहेब भोरे यांनी मार्गदर्शन केले.उमेद विभागाचे रवींद्र खलाटे,पवन पटारे कृषि विभागाचे राजेश पऱ्हे, पानी फाउंडेशनचे वैभव गारुडकर, रुपेश गायकवाड यांनी शेतकरी गट बांधणीसाठी अथक परिश्रम घेतले.या अंतर्गत पिंपरी निर्मळ येथे “सरस्वती शेतकरी महिला गट” यांच्या माध्यमातून माती नमुना घेणे व विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. गटातील महिला व पुरुष सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिकरित्या माती नमुना व दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक केले.यावेळी मंडळ कृषी अधिकारी लोणी रमेश चोपडे यांनी शेतकरी गटांचे महत्त्व व सामूहिक शेती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. सहायक कृषी अधिकारी तथा पाणी फाउंडेशन मेन्टर राजेश पऱ्हे यांनी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या मूल्यांकन निकषांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पाणी फाउंडेशनचे समन्वयक वैभव गारुडकर यांनी स्पर्धेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन स्पष्ट केले.आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर कडू यांनी दशपर्णी अर्क तयार करणे व माती नमुना घेण्याच्या पद्धतीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. सरस्वती महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा मीनाताई निर्मळ (संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती राहात )यांनी संपूर्ण बैठकीचे व प्रात्यक्षिकाचे नियोजन केले.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी जया निमसे यांच्यासह आबा निर्मळ, वनिता निर्मळ, सुवर्णा निर्मळ, माया निर्मळ, सविता निर्मळ, कविता निर्मळ, सुरेखा निर्मळ, गणेश निर्मळ, मोहिनी निर्मळ, रवींद्र निर्मळ, स्वाती निर्मळ आदी महिला व शेतकरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्या नगर जिल्ह्यात राहता तालुक्यात सत्यमेव जयते फार्मर कप अंतर्गत सर्वाधिक शेतकरी गट बांधणी







