शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

वडगावपान साठवण तलावातील पाण्याचे महायुती कार्यकर्त्यानी केले जलपूजन

---Advertisement---

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; तळेगावसह २१ गावांच्या पाणीप्रश्नाला दिलासा

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील प्रवरा नदीवरून वडगावपान साठवण तलावापर्यंत पाणी आणणाऱ्या पाईप लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर या योजनेचे पाणी वडगावपान साठवण तलावात दाखल झाले. हे पाणी तलावात पोहोचताच वडगावपान, निळवंडे, करुले तळेगाव तिगाव परिसरातील महायुतीच्या कार्य कर्त्यांनी जल्लोष करत साडी-चोळी अर्पण करून जलपूजन केले.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही तळेगावसह परिसरातील २१ गावांसाठी महत्त्वाची असून, या योजनेद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, योजनेची पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने वडगावपान, निळवंडे, करुले, तळेगाव, दिघे, तिगाव, माळेगाव हवेली आदी गावांसह परिसरातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.या गंभीर प्रश्नाची दखल घेत पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या योजनेच्या कामाला गती मिळालीअन नादुरुस्त पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले.
निंबाळे येथील प्रवरा नदीवरून पाणी उचलून नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे ते वडगावपान येथील साठवण तलावात दाखल झाले. त्या मुळे परिसरातील नागरिकांना आता नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या योजनेच्या पुनरुज्जीवनामुळे हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याची भावना वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात,निळवंडे उपसरपंच भाऊसाहेब आहेर, शिवसेना वैद्यकीयसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष डांगे, तळेगावचे उपसरपंच मयूर दिघे, दत्तात्रय दिघे, निखिल सानप यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले.

“तळेगाव पाणीपुरवठा योजना अखेर सुरळीत सुरू करण्यात आली असून, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार जीवन प्राधिकरण विभागाने नादुरुस्त पाईपलाईनचे काम पूर्ण केले. त्यामुळे वडगावपान साठवण तलावात पाणी दाखल झाले आहे. मात्र, काही जणां कडून यान केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.” – श्री श्रीनाथ थोरात, सरपंच, वडगावपान

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न सोडवून जनतेला दिलासा देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यात पाणीटंचाईची समस्या कमी होईल, असा विश्वास तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या २१ गावांतील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment