शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

उन्हाळ्यात किडनीच्या आरोग्यासाठी आवश्यक काळजी – डॉ. सागर हासे (किडनीविकार तज्ञ) यांचे मार्गदर्शन

---Advertisement---

तीव्र उन्हाळा आणि वाढते तापमान यामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते, ज्याचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात किडनीच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मेडिकव्हर हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी विभागातील तज्ञांनी आवाहन केले आहे.

किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे, पाण्याचे संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि रक्तातील क्षारांचे प्रमाण योग्य राखणे अशी महत्त्वाची कार्ये पार पाडते. मात्र, उन्हाळ्यात निर्जलीकरण (Dehydration) झाल्यास किडनीवर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे तिच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

उन्हाळ्यात किडनीचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाच्या उपायांबाबत मार्गदर्शन करताना डॉ. सागर हासे सांगतात:

  • पुरेसे पाणी प्या: दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तहान लागण्याची वाट पाहू नका.
  • ओआरएस, लिंबूपाणी किंवा ताक यांचे सेवन करा: उष्णतेमुळे शरीरातील क्षार कमी झाल्यास ते भरून काढण्यास मदत होते.
  • जास्त उन्हात फिरणे टाळा: विशेषतः दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
  • ताजे व पौष्टिक अन्न खा: फळे, भाज्या, सॅलड आणि नारळपाणी यांचा आहारात समावेश करा.
  • जंक फूड व जास्त मीठ टाळा: जास्त मीठ किडनीवर अतिरिक्त ताण निर्माण करते.
  • वेदनाशामक औषधांचा (Painkillers) अति वापर टाळा: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नियमितपणे घेऊ नका.
  • मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवा: यामुळे किडनीचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.
  • लघवीचा रंग तपासा: गडद पिवळी लघवी हे निर्जलीकरणाचे लक्षण असू शकते.

तसेच पुढे माहिती देताना डॉ. हासे यांनी नमूद केले की, पायांना सूज येणे, चेहऱ्याला सूज येणे, लघवी कमी होणे किंवा जास्त प्रमाणात होणे, लघवीत रक्त जाणे, अशक्तपणा, उलटी होणे,मळमळ होणे,भूक न लागणे,यापैकी कुठली लक्षणे आढळल्यास त्वरित मेडिकव्हर हॉस्पिटलचे किडनीविकार तज्ञ यांना भेटावे.
“किडनी आजाराची लक्षणे अनेकदा उशिरा दिसतात, त्यामुळे नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. क्रिएटिनिन (Creatinine) आणि GFR व urine test या साध्या रक्त लघवी तपासणी मधून किडनीचे आरोग्य समजू शकते,” असे डॉ. हासे यांनी सांगितले.
नागरिकांनी उन्हाळ्यात किडनीच्या आरोग्याबाबत सजग राहावे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तज्ञांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment