लातूर : मदन धुमाळ यांनी शिक्षकांच्या प्रश्न प्रती कायम पुढाकार घेतला असून त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नावर कायम संघर्ष करत शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी लातूर येथे केले.
लातूर येथील राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ यांचे सेवापुर्ती सोहळा निमित्त आयोजित ग्रंथतुला व गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठवाडा शिक्षक विभागाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे प्रतोद विक्रम काळे होते.
व्यासपीठावर माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, राजश्री शाहू महाविद्यालय प्राचार्य महादेव गव्हाणे , सह्याद्री हॉस्पिटल लातूर संचालक हनुमंत किनीकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव अजय जाधव, राजमाता जिजामाता महाविद्यालय प्राचार्य डी.एन.केंद्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर, माधवराव गादेकर, गजानन भोपणीकर, अंकुश नाडे , जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष वनिता काळे, नगरसेविकास स्वाती घोरपडे, मोहनराव हाके, महेश बँकेचे संचालक देवेंद्र जाधव, दयानंदराव झांबरे , सुधाकरराव माने , तानाजी पाटील, महेश देवणे, श्रीमंतराव शेळके, दीपकराव जाधव, बालाजीराव रोकडे, जगदीश जाधव सर, धनराज धुमाळ, कैलास क्षीरसागर, सह आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना सहकार मंत्री ना .पाटील म्हणाले की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते , मदन धुमाळ सर यांच्या अर्धांगिनी मुळे त्यांना संपूर्ण जिल्ह्यात शिक्षकांना न्याय देता आला आता त्यांनी त्यांना अधिक उर्वरीत आयुष्य आनंदात काढावे असे मत सुद्धा सहकार मंत्री नामदार पाटील यांनी यावेळी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राध्यापक गणेश बेळंबे यांनी सादर केले . यामध्ये त्यांनी या कार्यक्रम मागची भूमिका विशद केली.
यावेळी आ. संजय बनसोडे, आ . विक्रम काळे , राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे, माधव गादेकर, वसंत धुमाळ, दयानंद कांबळे, माहेश्वरी धुमाळ यांनी मनोगत व्यक्त करत मदन धुमाळ यांच्या बद्दल भावना व्यक्त केल्या.
स्वागत समितीने आयोजित केलेल्या सत्काराला मदन धुमाळ यांनी उत्तर देत, सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील, आ . संजय बनसोडे आमदार आ. विक्रम काळे यांच्या प्रेरणेने मला अधिक काम करता आले. भविष्यात सुद्धा त्यांची प्रेरणा घेऊन मी अधिक काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मदन धुमाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद कांबळे, गणेश बेळंबे यांनी केले.
सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मदन धुमाळ यांचा नागरिक सत्कार व त्यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
मदन धुमाळ यांनी त्यांचा शिक्षकांच्या प्रश्नाप्रती कायम पुढाकार: सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील







