शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महाराष्ट्र दिन शां. ज. पाटणी विद्यालयात उत्साहात साजरा..

---Advertisement---

श्रीरामपूर:विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान आत्मसात करावे. स्पर्धेच्या युगामध्ये सामान्य ज्ञानाला असामान्य महत्त्व असून पुस्तके ज्ञानाबरोबर ते आत्मसात करावे. असे आवाहन शेतकरी कृषी सेवा केंद्राचे संचालक श्रीधर कोलते यांनी विद्यालयात ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या वेळी केले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिन प्रसंगी विद्यालयात श्रीधर कोलते यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर सुनील पंडित, नंदकुमार अंभोरे, देविदास चव्हाण, पद्माकर जोशी, स्कूल कमिटी सदस्या चित्रा कडू,मानसी घोलप भूषण साठ्ये आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
डॉक्टर सुनील पंडित यांनी महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी संशोधन करण्यासाठी प्रेरित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक शिरसाठ यांनी केले.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात पाचवी ते नववी प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
मान्यवरांच्या सत्काराचे नियोजन नितीन यशवंत,कार्यक्रमाचे सूत्रसंचालनhवव उर्मिला पुजारी व प्रकाश कळमकर यांनी केले तर आभार कैलास जेजुरकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग प्रयत्नशील होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment