मोठ्या जल्लोषात विवेकभैय्या कोल्हे यांचा विधानपरिषद उमेदवारी अर्ज दाखल
विवेकभैय्या कोल्हे यांचा आवाज विधान परिषदेमध्ये गाजणारभाजपा समर्थकांनी केला
मुंबई, अहिल्यानगर, नाशिक,संभाजीनगर,नंदुरबारसह विविध ठिकाणी जल्लोषभाजपाकडून विधानपरिषदेसाठी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली असून या पार्श्वभूमीवर विधानभवनात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी उस्फूर्तपणे उपस्थित राहिलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण घोषणांमुळे विधानभवन परिसर दुमदुमून गेला होता.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री जयप्रकाश गोरे, मंत्री आशिष शेलार, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली विवेकभैय्या कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला.अर्ज दाखल केल्यानंतर कोपरगावसह नगर नाशिक नंदुरबार जळगाव धुळे यासह असंख्य ठिकाणी कोल्हे समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी विवेकभैय्या कोल्हे यांना खांद्यावर उचलून घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी कोल्हे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने समर्थक मंत्रालयात उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा विजय असो,धन्यवाद धन्यवाद देवाभाऊ धन्यवाद,महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवाभाऊ देवाभाऊ,विवेकभैय्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है आणि भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.भाजप नेतृत्वाने विवेकभैय्या कोल्हे यांना विधान परिषदेत संधी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. सहकार,सामाजिक, युवा सक्षमीकरण क्षेत्रात कमी वयात नावलौकिक मिळवलेल्या, अभ्यासू आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या विवेक कोल्हे यांना या संधीमुळे जनसेवा अधिक व्यापक करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयाचे राज्याच्या विविध भागातून स्वागत होत असून, या नेतृत्वाच्या माध्यमांतून प्रश्न मांडून विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







