शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महिलांना राजकीय आरक्षण देण्यास मोदी सरकार कटिबध्द – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

---Advertisement---

फिक्कीच्या महिला विभाग नवनियुक्त अध्यक्षा सिमा सरोज यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार

मुंबई – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचे केंद्र सरकार महिलांना राजकीय आरक्षण मिळवुन देण्यास कटिबध्द आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी हाणुन पाडले. परंतु महिलांना लोकसभा आणि विधानसभा मध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मोदी सरकार कटिबध्द आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
महालक्ष्मी रेसकोर्स येथील सभागृहात फिक्कीच्या ( फेडरेशन ऑफ इंडस्ट्री चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया) मुंबई विभागीय महिला सम्मेलनात प्रमुख अतिथी म्हणुन ना.रामदास आठवले बोलत होते. फिक्की संघटनेच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. फिक्कीच्या फ्लो या महिला संघटनेचा 24 वा वर्धापनदिन यावेळी ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी फिक्की महिला संघटनेच्या फ्लो च्या मुंबई अध्यक्षपदी सिमा सरोज यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त फिक्की लेडिज ऑर्गनायझेशन (प्लो) च्या अध्यक्ष सिमा सरोज यांचा ना. रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पदमश्री कल्पना सरोज; सामिना खोराकिवाला ;किरण गेरा आणि विनिता बिमबेट आदी नामवंत उद्योजक महिला उपस्थित होत्या.
भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर येवुन प्रगती झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे धोरण आहे, त्यामुळे देशाचा विकास होत आहे. मेक इन इंडिया, या संकल्पनेचे देशात आणि जगातही कौतुक झालेले आहे. देशात विकासाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आलेली आहे. एक दिवस निश्चित भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर येईल असा आम्हाला विश्वास आहे. त्या दृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
केंद्र सरकार हे महिलांना सर्व क्षेत्रात पाठिंबा देत आहे. महिलांची सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे. उद्योग क्षेत्रातही महिला आघाडीवर आहेत. या आम्हाला अभिमान आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment