शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

२० रुपयांनी मिळाला दोन लाखांचा ‘आधार’

---Advertisement---


श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील वाकडी येथील अपघातात निधन झालेल्या बँकेच्या दोन ग्राहकाच्या कुटुंबियांना २० रूपयांच्या अपघात विमाचा मोठा आधार मिळाला आहे. या विम्यातून त्यांच्या कुटूंबियास २ लाख रुपयांचा धनादेश मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
वाकडी येथील सुनिल अशोक सदाफळ यांचे वाकडी-गणेशनगर रोड येथे अपघाती निधन झाले. त्यांचे वाकडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत बँक खाते असून त्यामधून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा २० रुपयांचा हप्ता कपात झालेला होता. त्याअनुषंगाने त्यांच्या वारस पत्नी पुनम सुनिल सदाफळ यांना २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच प्राची सचिन लांडे यांचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचे पती सचिन संजय लांडे यांनाही २ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक रोहन अहिरे, अनिमेश सिंग, कॅशियर रंगनाथ आदमाने, आर.एम. गायके, श्री. बारसे उपस्थित होते. याकामी बँकेचे श्रीकांत साबळे, बंटी गोरे यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment