बेलापूर – श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु ॥ ते वळदगांव रस्त्यावरून खानीतील बेकायदा अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने सपूर्ण रस्ता खड्डेमय होवून उखडला आहे . गेल्या दोनवर्षा पूर्वी हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला तो निकृष्ट केला. त्यावर आता २० ते ४० टन मुरूम खडी दगडाच्या गाड्या भरधाव वेगात जावून पूर्ण रस्त्याचे नुकसान झाले .याबाबत नागरिकांनी संतप्त झाले असून अवजड वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे. आरटीओ, पोलीस व महसूल यंत्रणेने यावर कठोर कारवाई करावी व रस्त्याच्या नुकसानीची भरपाई अवजड वाहनांनकडून करावी . याभागात राहणारे अनेक गरीब शेतकरी कुटुंबे तसेचे अनेल लहान मुले मुली विद्यार्थीनी जातात त्याचे अनेक किरकोळ अपघात या रस्त्याचे खड्डयांमुळे झाले आहेत .काही दिवसांपूर्वी वळदगाव खाण परिसरात दुचाकी स्वार घसरून पडला. त्याला डोक्याला मार लागला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. खाणीवाले अवजड वाहने पैसे कमवणार आणि गरिबाचे जीव घेणार का, असा सतप्त सवाल या परिसरातील नागरीकांनी उपस्थित केला असून . या भरधाव चालणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस महसुल व आरटीओ हे प्रशासन जबाबदार राहील . वळदगांवचे सरपंच यांचेकडेही नागरीकांनी तक्रारी केल्या आहेत. शाळेत जाणाऱ्या मुले मुलींना या वाहनांचा व खराब रस्त्यां चा प्रचंड त्रास होत आहे .त्यामुळे या लहान रस्त्याने अवजड वाहनांच्या रहदारीला प्रतिंबंध करवा अशी मागणी होत आहे.
अवजड वाहनांनमुळे बेलापूर – वळदगांव रस्त्याची दुरवस्था कारवाई करण्याची संतप्त नागरिकांची मागणी







