शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सौ.रेश्मा ढेरंगे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

---Advertisement---

श्रीरामपूर : समाजातील उपेक्षित वंचित व गोरगरिबांसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन आज मला समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले या सन्मानाने निश्चितच मला प्रेरणा मिळेल व समाजासाठी जगण्याची ऊर्जा प्राप्त होईल, आणि यातूनच मला भविष्यात काम करण्याची ऊर्जा मिळेल असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सौ रेश्मा ढेरंगे यांनी केले.
श्रीरामपूर येथील आगाशे सभागृहामध्ये लोककलावंत साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य , लक्ष्मी माता मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानेआयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण व कवी संमेलन सोहळ्यात त्या बोलत होत्या याप्रसंगी व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर बाबुराव उपाध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे मा. प्राचार्य टी.ई. शेळके ज्येष्ठ साहित्यिक सायमन भारस्कर निवृत्त पोलीस अधिकारी संजय भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रास्ताविक कवी बाबासाहेब पवार यांनी केले.
सौ ढेरंगे आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या स्त्रियांनी स्वतःचा आत्मविश्वास तयार केला पाहिजे आजच्या युगात प्रत्येक स्त्री ही सक्षम आहे हे देखील असले तरी स्त्रियांनी स्वतःचा आत्मपरीक्षण करून समाजकार्य केले पाहिजे चांगल्या कामाची समाज हा निश्चितच दखल घेत असतो ते सांगावं लागत नाही आज या ठिकाणी अनेक ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार उपस्थित आहेत यांच्या हस्ते माझा गौरव होणं ही खूप माझ्यासाठी प्रेरणा देणारी घटना आहे मी जे काही काम करते ते सर्वसामान्य व संघर्षातून उभ केलेला आहे त्यामुळे त्याला टिकाऊपणा आहे विकाऊ नाही यापुढील काळातही आपण स्त्रियांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे शासन दरबारी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment