शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महात्मा फुले भारतातील प्रबोधन युगाचे पितामह – कानडे

---Advertisement---

श्रीरामपूर : जेव्हा रुढी-परंपरा व धर्मबंधनाचा औंडुबर माजवून शुद्र, अतिशुद्र, व माता भगिनीचे शोषण केले जाते, या सर्वांना शिक्षणापासुन वंचित ठेवल होत. त्या काळात महात्मा फुले यांनी कष्टकरी, शेतकरी, आणि महिला वर्गाला शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे महात्मा फुले भारतातील प्रबोधन युगाचे पितामह असल्याचे प्रतिपादन माजी आमदार लहू कानडे यांनी केले.
महात्मा जोतीबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. श्री. कानडे म्हणाले की, समाजातील विषमता, आणि शोषण केवळ अज्ञानामुळे होते. हे केवळ सांगितलेच नाही तर प्रत्यक्ष कृतीद्वारे या गरीब वर्गासाठी शाळा सुरु केल्या. सत्यशोधक कार्यकर्त्यांची फळी उभी केली, अन्यायाविरुध्द दंड थोपटणे आणि ख-या अर्थांने प्रबोधनाचे युग सुरु झाले, या वर्षापासुन महात्मा फुले यांचा द्विशताब्दी जयंती महोत्सव सुरु होते आहे. आपण सर्वांनी त्याचे विचारधन समजून घेवुन त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे हीच सर्वात मोठी आदरांजली असेल.
याप्रसंगी अशोक भोसले, सचिन जगताप, प्रद्युम्न जगताप, ए. एस. निकमसर,ॲड.रावसाहेब मोहन, सतीश बोर्डे,संदीप गुलदगड, चांगदेव देवराय, राजुमामा औताडे,दिपक कदम, ढोणे सर, तुकाराम चिंधे, हरिभाऊ बनसोडे, अंजिक्य उंडे, सुभाष मांजरे, अशोक गायकवाड, आशिष शिदे, मुख्तारभाई शाह,सादिक मिर्झा, भैय्याभाई शाह, फैय्याज बागवान,फैय्याजभाई कुरेशी, यूनूस पटेल, शब्बीर पटेल, जमीर पिंजारी, अशोक जाधव, प्रताप पटारे,किशोर फाजगे इत्यादि कार्यकर्ते उपस्थीत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment