शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

चितळी-गोंडेगाव रस्त्याचे काम वादाच्या भोवऱ्यात

---Advertisement---

श्रीरामपूर: तालुक्यातील चितळी-गोंडेगाव रस्त्याचे काम येथील राजकीय वादात अडकले असून येथील शिवनाथ फोफसे यानी दावा केला आहे की, खा. सदाशिव लोखंडे यांच्या विशेष निधीतून या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली असल्याने श्रीरामपूर व राहाता तालुक्यांना जोडणारा चितळी-गोंडेगाव रस्ता अखेर पूर्णत्वास आला आहे. त्यावर चितळी-गोंडेगाव या रस्त्याचे ३ कोटी ५८ लाखांचे काम निकृष्ट दर्जाचे व इस्टीमेटनुसार झालेले नसल्याने या कामाची सखोल चौकशी करुन रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात – फोपसे
श्रीरामपूर व राहाता तालुक्यांना जोडणारा चितळी-गोंडेगाव रस्ता अखेर पूर्णत्वास आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी खा. सदाशिव लोखंडे यांच्या विशेष निधीतून या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली असल्याची माहीती शिवसेना तालुका उपप्रमुख शिवनाथ फोफसे यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, या रस्त्यामुळे श्रीरामपूर व राहाता तालुक्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः कृषी उत्पादनांची वाहतूक जलद व सोयीस्कर होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या देखील याचा फायदा होणार आहे.
या कामासाठी रवींद्र वाघ (चितळी), राजेंद्र देवकर (माजी जिल्हाप्रमुख) तसेच राजेश तांबे (उपजिल्हाप्रमुख), दिगंबर आमले, अरुण म्हैस, नवनाथ फोफसे, अण्णासाहेब फोफसे, विलास कदम, संतोष हरगुडे, विकास फोफसे, विकास सोनवणे, राजेंद्र बढे यांच्यासह गोंडेगाव आणि चितळी येथील पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
स्थानिक नागरिकांनी माजी खा. सदाशिव लोखंडे यांना धन्यवाद दिले आहेत. हा रस्ता परिसराच्या विकासाला गती देणारा ठरणार असल्याची भावना श्री. फोपसे यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.

निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी
चितळी-गोंडेगाव या रस्त्याचे ३ कोटी ५८ लाखांचे काम निकृष्ट दर्जाचे व इस्टीमेटनुसार झालेले नसल्याने या कामाची सखोल चौकशी करुन रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे करण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव ग्रामस्थांनी पत्रकाद्वारे केली आहे.  पत्रकात म्हटले आहे की, २०२२-२३ मध्ये खा. सदाशिव लोखंडे यांनी मंजूर केलेल्या चितळी-गोंडेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. तसेच सदर काम हे इस्टीमेटनुसार झालेले नाही. त्यामुळे याबाबत चौकशी करावी, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल काढू नये, अन्यथा गोंडेगाव ग्रामस्थांच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा पत्रकातून देण्यात आला आहे. पत्रकावर अनिल कुन्हाडे, अमोल तांबे, संतोष भवर, बाबासाहेब हरगुडे, रामनाथ मोरे, विजय हरगुडे, विशाल हरगुडे, राजेंद्र तांबे, विजय तांबे, संतोष तांबे, सोमनाथ आमले, सुनिल जगताप, संदीप हरगुडे, नवनाथ थोरात, काशिनाथ अमले, गणेश जगताप, शिवाजी शिंदे, गणेश भवार, अविनाश फोफसे, रघुनाथ सोनवणे, शिवाजी आमले, कारभारी तांबे, शांताराम गायकवाड, कारभारी तांबे, आकाश कुऱ्हाडे, संभाजी हारगुडे, कैलास हरगुडे, गोरख थोरात, सूर्यभान कुन्हाडे आदींसह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment