संजय राऊत हेच लुटारू टोळीचे सरदार आहेत हे महाराष्ट्राने पाहिले आहे. सत्तेत असताना संजय राऊतांनी महाराष्ट्र लुटण्याचे काम केले. मुंबई लुटली आणि पत्रा चाळही लुटली. राऊत हे लुटारू टोळीचे सरदार आहेत, असा घणाघात भाजपाचे मुख्य प्रवक्ते श्री. नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.
संजय राऊत लोकशाही कुठे आहे आणि ट्रम्पशाही कुठे आहे हे सांगण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ज्या पद्धतीने अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावण्याचे काम तुम्ही केले त्यावेळेला तुम्हाला लोकशाहीची भाषा आठवत नव्हती. सर्वसामान्य नागरिकांची घरे पाडली जात होती तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवत नव्हती का? लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही कारण तुमचा पक्ष घराणेशाहीवर अवलंबून आहे, असे श्री. बन यांनी सुनावले.
संजय राऊत यांना स्वत:च्या पक्षात काय, कुठेच मान्यता नाही. काँग्रेसचे पर्यायी नेतृत्व आपणच आहोत असा समज त्यांनी करून घेतला आहे. मात्र काँग्रेस संपण्याचा प्रवास सुरु झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तर काँग्रेस हा एका कुटुंबापुरता मर्यादित झालेला पक्ष आहे. जनतेला योग्य पर्याय मिळाला आहे. पुढील काळात काँग्रेस याहीपेक्षा रसातळाला जाणार असल्याचे श्री. बन म्हणाले.
संजय राऊत हे तर लुटारू टोळीचे सरदारभाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात







