शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

---Advertisement---

बारामती पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आग्रह

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच, अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी भूमिका ना. रामदास आठवले यांनी मांडली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ना. रामदास आठवले यांनी सांगितले की, बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी मला प्रचारासाठी आमंत्रित केले असून, मी बारामतीला जाणार आहे. काँग्रेस पक्षाने अजित पवार यांचे योगदान लक्षात घेऊन ही जागा बिनविरोध निवडून द्यावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बारामतीमध्ये उमेदवार देऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले. अजित पवार हे राज्यातील एक मोठे नेते होते. त्यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ना. रामदास आठवले यांनी त्यांच्या राज्यसभा खासदारकीच्या तिसऱ्या कार्यकाळाबद्दल सांगितले. मला मिळालेल्या खासदार पदाचा उपयोग देशभरात पक्ष वाढवण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्यासाठी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मला पाठबळ दिल्याबद्दल ना. रामदास आठवले यांनी आभार मानले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे अनागोंदी सरकार असून, यंदाच्या निवडणुकीत भाजप सत्तेत येईल, असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तेथे मी प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहे. आसाममध्ये चार ठिकाणी, तर तामिळनाडूमध्ये ४० उमेदवारांना आमच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. तामिळनाडूमध्ये यंदा एनडीए सत्तेत येईल, अशी अपेक्षा ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. पक्ष मान्यता टिकवून ठेवण्यासाठी विविध राज्यांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहोत. पाँडिचेरीमध्ये आम्ही भाजपला साथ दिली आहे, तर केरळमध्ये एक जागा लढवत आहोत.
सर्व जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली. ओबीसींना देखील राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे. महिलांसाठी लोकसभेत २७३ जागा वाढवण्यासाठी लवकरच संसदेत विशेष विधेयक येणार आहे, ज्यामुळे महिलांना राजकारणात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळेल, असेही ना. रामदास आठवले म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषद आमदारकी आणि दोन महामंडळ पदे देण्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाला लवकरच हा वाटा मिळावा, अशी आमची मागणी आहे, असे ना. रामदास आठवले यांनी नमूद केले.
पुणे महानगरपालिकेत भाजपने रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद दिले आहे. त्यांच्यावर अन्याय होत नाही, पण त्यांना आवश्यक बैठकांना बोलावले गेले पाहिजे. दोन पक्षांमध्ये गैरसमज होऊ नयेत यासाठी चर्चा करून कोणताही वाद राहू नये, असेही ना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment