- म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना साकडे
मुंबई : पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांसाठी अनिवार्य सामूहिक वैद्यकीय गट विमा योजना तातडीने लागू करण्याची मागणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबईने मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्यात सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया ही लाखो तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी आहे. तथापि, सदर प्रक्रिया अत्यंत कठीण व शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी असून, धावणे, शारीरिक चाचण्या व इतर टप्प्यांमधून उमेदवारांना जावे लागते. या प्रक्रिये दरम्यान उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात शारीरिक ताण येत असून, आरोग्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया उच्च जोखमीची (Risk) असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात मागील काही काळात काही गंभीर घटना घडून
उमेदवारांचा मृत्यू झाला आहे.
२८ मार्च २०२६, पुणे (शिवाजीनगर पोलीस मुख्यालय मैदान) २३ वर्षीय उमेदवाराचा १६०० मीटर धावण्याच्या चाचणी दरम्यान अचानक कोसळून मृत्यू झाला, . २२ फेब्रुवारी २०२६, छत्रपती संभाजीनगर (GRP भरती) २४ वर्षीय उमेदवारांच्या चाचणी दरम्यान मृत्यू: RISING TOGETHER TO TRANSFOR झाला., फेब्रुवारी २०२६, बीड जिल्हा १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत सहभागी उमेदवाराचा मृत्यू; त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात भरती वेळापत्रकात बदल करावा लागला.
याशिवाय, विविध जिल्ह्यांमध्ये उष्माघात (Heat Stroke), हृदयविकाराचा झटका व गंभीर दुखापतींच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. या सर्व घटनांमुळे उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आर्थिक व मानसिक परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने तातडीने पुढाकार घेऊन पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी ‘अनिवार्य सामूहिक वैद्यकीय गट विमा योजना’ लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. असे असोसिएशनचे कार्याध्यक्ष इंजि. रमेश भुतेकर – देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.








