शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेस खेळाडूंचा चांगला प्रतिसाद

---Advertisement---

मुंबई: येत्या १७ ते १९ एप्रिल दरम्यान आयोजित मुंबई विभाग स्तरीय अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेत ४० संघातून ७०० हून जास्त खेळाडूंनी नोंद केली आहे. बोरीवली पश्चिम स्थित सुविद्या प्रसारक संघ, स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर व मल्लखांब लव संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेचे हे ५ वे वर्ष आहे. कर्ममूर्ती महादेव गोविंद रानडे सरांचे अमृतमहोत्सवी वर्ष देखील साजरे करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वा. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर आमदार अतुल भातखळकर, नगरसेविका सीमा शिंदे, श्वेता कोरगावकर, नगरसेवक तेजिंदर तिवाना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पारितोषिक वितरण रविवारी रात्री ८ वा. माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अध्यक्ष सिद्धेश कदम, उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका संध्या दोशी, नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
६/८/१०/१२/१४/१६/१८ या वयोगटात होणाऱ्या स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना अजिंक्यतारा पदक, सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रत्येक वयोगटात सांघिक व वैयक्तिक विजेत अशी भरघोस पारितोषिकं देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे भारतातील एकमेव पॅरा मल्लखांब स्पर्धा १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा होणार आहेत. मुकबधीर, अंध, ऑटिस्टिक इ खेळाडू आपले मल्लखांब कौशल्य सादर करणार आहेत. या खेळाडूंना देखील पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून आशिष देवल आणि स्पर्धा सचिव म्हणून संचिता देवल काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख आशिष देवल ९६६४००२०५१ यांच्याशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment