शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेत डॉली गुप्ता कास्य पदकाची मानकरी

---Advertisement---

ठाणे : हरिभाई देवाकरण प्रशाला , सिध्देश्वर पेठ , सोलापूर या ठिकाणी झालेल्या २०२६ च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मीरा,भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील युवा महिला कुस्तीपटू डॉली गुप्ताने चमकदार कामगिरी करताना ६२ किलो वजनी गटात कास्य पदक मिळवले. या स्पर्धेत तिला पहिल्या सामन्यात कोल्हापूरच्या राधिका ढेरे सोबत झालेल्या‌ लढतीत गुणांवर हार खावी लागली. कुस्ती च्या नियमा नुसार तिचा प्रतिस्पर्धी फायनल मध्ये पोहोचल्यावर रीपॅच नियमा नुसार डॉली ला कास्य पदकाच्या लढतीसाठी संधी मिळाली .या संधीचा तिने लाभ घेतला.
या वेळी तिची दुसरी लढत रायगड च्या वैष्णवी कुंभार सोबत झाली. या सामन्यात डॉलीने ही कुस्ती सहज जिंकली.मग डॉली ची कास्य पदकाची लढत नाशिक शहर च्या संस्कृती शिरसाट सोबत झाली या सामन्यात डॉली ने आक्रमक खेळी करत संस्कृती ला चितपट करून कांस्य पदक आपल्या नावी केले.
डॉली सध्या बाल-भारती का.एम.जे. पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स, कांदिवली (पश्चिम), येथे वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. डॉली गेली ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विविध स्पर्धात सहभागी होत असुन तिने बऱ्यापेकी पदकांची कमाई देखील केली आहे. तिला ‌वसंतराव पाटील व एन.आय.एस कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment